अंगणवाडी, आशा सेविकांना रक्षाबंधनाची अनोखी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी, आशा सेविकांना 
रक्षाबंधनाची अनोखी भेट
अंगणवाडी, आशा सेविकांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

अंगणवाडी, आशा सेविकांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

sakal_logo
By

चास, ता. ४ ः खेड तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांना जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबाजी काळे यांच्याकडून रक्षाबंधनाची अनोखी भेट देण्यात येत असून भारतीय डाक विभागाची दहा लाख रुपयांचा अपघात विमा पॉलिसी भेट देण्यात येत असून यामुळे या सर्व महिला कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच प्राप्त होणार आहे.
भारतीय डाक विभागाच्या वतीने अठरा ते पासष्ट वयोगटातील सर्व नागरिकांसाठी फक्त ३९९ रुपये भरून दहा लाख रुपयांचा अपघाती विमा प्राप्त होणार आहे. बाबाजी काळे यांनी विम्याची रक्कम बाबाजी काळे युवा मंचच्या माध्यमातून भरून खेड तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी विविध गावांमध्ये कँप लावले जात आहेत. या कँपमध्ये गावातील अन्य नागरिकांची विमा पॅालिसी केली जातेच पण येथे आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांची मंचच्या वतीने मोफत पॅालिसी करून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली जात आहे. डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भोगाडे, तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चास येथे धनंजय महाडीक, वैष्णवी बोंबले, माधव कशाळे, स्वाती डामसे, रोहन बांगर, गणेश कोंढावळे हे डाक विभागाचे कर्मचारी नागरिकांना सेवा देत असून या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख राहुल मलघे, रोहिदास राक्षे, भरत राक्षे, नितीन टोके, अंगणवाडी सेविका श्यामल लांडगे यांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00209 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..