डेहणे परिसर घोषणांनी दुमदुमला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेहणे परिसर घोषणांनी दुमदुमला
डेहणे परिसर घोषणांनी दुमदुमला

डेहणे परिसर घोषणांनी दुमदुमला

sakal_logo
By

चास, ता.११ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आदिवासी बांधव, बिरसा ब्रिगेड शाखा खेड व आदिवासी विचार मंच खेड यांनी एकत्र येत संयुक्तपणे आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. यावेळी भोरगिरी ते कुडे (ता. खेड) या मार्गावर पार पडलेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला. ''वनवासी नही हम आदिवासी है, इस देश के मुलनिवासी है'' अशा विविध घोषणांनी डेहणे परिसर दुमदुमला.
वर्षानुवर्षे निसर्गाच्या सानिध्यात जीवन व्यतीत करणारा आनंदी व समाधानी वृत्तीचा आदिवासी माणूस हा आजही आपल्या मूलभूत अधिकारापासून वंच्छिच आहे त्यामुळेच आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृती जागविण्यासाठी व त्यांना मानवंदना देण्याबरोबरच आपल्या हक्क व अधिकारांची जाणीव व्हावी या उद्देशाने हा समाज आदिवासी दिनाचे औचित्य साधत एकत्र येत असतो. नऊ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य स्वरूपात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भोरगिरी-शिरगांव-धामणगांव-घोटवडी-कुडे-साकुर्डी- माजगांव-सुरकुंडी-वाळद-आव्हाट-खरोशी या मार्गाने दुचाकी व चारचाकीची रॅली भरपावसात काढण्यात येवून अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. रॅलीचा शेवट डेहणे येथे करण्यात आला. या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा नियोजनचे दिलीप मेदगे, माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, डेहणेचे सरपंच दत्ता खाडे, एकनाथ तळपे, तानाजी मुऱ्हे, हरिदास कोकाटे, रमेश डामसे, दादाभाऊ डामसे, मनोहर मदगे, लक्ष्मण मदगे, मनोहर गवारी, अशोक बांगर, रोहित सुपे, संतोष सुपे, संतोष लांघी, योगेश शिंगाडे, समीर सुपे, अरूण पारधी, सोमनाथ मुऱ्हे, संतोष लांघी, तान्हाजी भोकटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


00247

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00219 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..