चास ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चास ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान
चास ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान

चास ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान

sakal_logo
By

चास, ता. ११ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान ग्रामीण भागात जोर धरू लागले असून घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नागरिक स्वत:हून सहभागी होताना दिसतात. याबाबत जनजागृती सुरू असून चास (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चातून आपापल्या वॉर्डामध्ये घरोघरी मोफत तिरंगा देण्याची योजना केली असल्याची माहिती सरपंच शकुंतला मुळूक, उपसरपंच विनायक मुळूक तसेच ग्रामसेवक एस. के. ढोरे यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्याबरोबरच अन्य कार्यक्रम करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. चास येथे ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत बुधवारी (ता. १०) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, जवाहर विद्यालयातील शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवक यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस पाटील वंदना रासकर, संदीप ढमढेरे, भीमराव गायकवाड, नवनाथ वाळुंज, रेश्मा रासकर, विमल चासकर, शारदा टोके, परवीन तांबोळी, रामभाऊ नाईकरे, अतुल रोडे आदी सहभागी झाले होते. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीला राष्ट्रध्वजाची हमीरक्कम भरून आपापल्या वॉर्डात प्रत्येक घरात मोफत राष्ट्रध्वज देणार असून प्रत्येक नागरिकांनी १३ ते १५ ऑगष्ट दरम्यान घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करणार आहेत. यासाठी शालेय शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी त्यांना सहकार्य करणार आहेत.

फोटो : ००२४८
चास (ता. खेड) : अंगणवाडी कर्मचारी, शालेय शिक्षक यांसह नागरिकांना हर घर तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00220 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..