लक्ष्मी-नारायण मंदिरात चास येथे फुलांची सजावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी-नारायण मंदिरात 
चास येथे फुलांची सजावट
लक्ष्मी-नारायण मंदिरात चास येथे फुलांची सजावट

लक्ष्मी-नारायण मंदिरात चास येथे फुलांची सजावट

sakal_logo
By

चास, ता. १९ ः चास (ता. खेड) येथील श्री लक्ष्मी-नारायण सुवर्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करून मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते.
लक्ष्मी नारायण देवस्थान संस्थानच्या अध्यक्षा व खजिनदार अपर्णा बिंदुमाधव पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी श्रींची महापूजा पंचसुक्त पवमानाच्या वेदमंत्रांनी उसाच्या रसाने महाअभिषेक करण्यात आला. धार्मिक विधी सुरेश चासकर यांच्या मंत्रघोषात व लंडन येथील सत्येंद्र पाटणकर व ऐश्र्वर्या पाटणकर यांच्या हस्ते पार पडल्यावर २४६ वर्षे जुने असलेले सोन्याचे मुकुट तसेच पारंपारिक दागिन्यांनी श्रींच्या मूर्तींना सजविण्यात आले. रात्री बारा वाजता उत्साही वातावरणात कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दिल्ली येथून देवेंद्र पाटणकर व प्रज्ञा पाटणकर, आनंद करमरकर व मुक्ता करमरकर, यशवंत पाटणकर, मीनाक्षी जोशी, डॅा. सुशोभन पाटणकर, हर्षदा पाटणकर, अभिराम पाटणकर, सुप्रिया पाटणकर, धनंजय पाटणकर, कीर्ती पाटणकर, प्रकाश वैशंपायन, चंदा कोल्हटकर, विद्या साळगांवकर, पद्मा मोने, मंदार मोने, पाटणकर परिवारातील सर्व सदस्य तसेच यांसह मोने, बापट, अभ्यंकर, गद्रे, नाईक, परांजपे, भागवत, वैशंपायन, कुंटे परिवार तसेच चास व पंचक्रोशीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपर्णा पाटणकर यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
00266

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00237 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..