भाताच्या पिकास लगडल्या ओंब्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाताच्या पिकास लगडल्या ओंब्या
भाताच्या पिकास लगडल्या ओंब्या

भाताच्या पिकास लगडल्या ओंब्या

sakal_logo
By

चास, ता.१ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात भातपिकास आंब्यांनी लगडण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीनची पिके शेंगानी बहरण्यास सुरूवात झाली आहे. तसेच इतर पिकेही जोमदार आहेत. तसेच दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पिके जोमदार असून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षी शेतकरी बाळगून आहेत.

खेड तालुक्यात जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली व बघताबघता खरीप हंगामातील पिकांना पावसाने ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील प्रामुख्याने खरीप हंगामात भात हे मुख्य पीक असून जवळपास ३२०० ते ३३०० हेक्टर क्षेत्रावर भाताच्या लागवडी करण्यात आलेल्या आहेत. वाडा, वाळद, आव्हाट, खरोशी, डेहणे, भोरगिरी यांसह परिसरात खरीप हंगामात भात हेच मुख्य पीक असून चालू हंगामात चांगल्या होत असलेल्या पावसामुळे पिके जोमदार आहेत. सद्य स्थितीत पिकांना ओंब्या लगडण्यास सुरुवात झाल्याने चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकरी बाळगू लागली आहेत. भातपिके ओंब्यानी लगडण्यास सुरुवात झाल्याने तसेच सोयाबीनचे पीकही शेंगांनी भरण्यास सुरुवात झाली असून भुईमुगाची पिके आऱ्या लागण्याच्या अवस्थेत असल्याने या पिकालाही पावसाची गरज असतानाचा पावसाने जोरदारपणे आगमन केल्याने पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस उत्तम ठरतो आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे सर्वत्र निराशादायक वातावरण असताना चालू वर्षी बळीराजाच्या शेतात पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधानी असून पाऊस असाच बरसत राहिल्यास चांगल्या उत्पन्नाबरोबरच आशादायक वातावरण निर्माण होणार आहे.
----------------------
00287, 00286

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00255 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..