वाडा येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक
वाडा येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक

वाडा येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक

sakal_logo
By

चास, ता. २२ : वाडा (ता. खेड) येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ॲड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून अभिवादन केले. वेषभूषा केलेले विद्यार्थी व ढोल लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.
सरपंच रघुनाथ लांडगे, गोरक्षनाथ हुंडारे, कुमुदिनी केदारी, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव दुंडे व पर्यवेक्षक सतीश हाके यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवरून गावातून कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढली. मिरवणुकीत सूत्रसंचालन आशिष कांबळे यांनी केले. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील ढोल पथक व माध्यमिकचे लेझीम पथक यांनी आपली कला सादर केली. त्याचबरोबर दांडिया व गरबा नृत्य सादर केले.
माजी विद्यार्थी संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनोहर जाधव, उपाध्यक्षा शोभा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आय. आय. मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00283 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..