Pune वाडा परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cable thieves
वाडा परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट

Pune : वाडा परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट

चास : वाडा परिसरात विद्युत पंपांच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केबलसह गेल्या दोन महिन्यांत वाडा ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेच्या वीजपंपाची केबल तीनदा चोरीला गेली. गेल्या दोन दिवसांत सलग दोनदा चोरीला झाल्याने वाडा गावचा पाणीपुरवठा खंडित होत आहे. चोरांच्या सुळसुळाटामुळे ग्रामपंचायत प्रशासन व शेतकरी वैतागले आहेत तर पोलिस हतबल झाल्याचे चित्र आहेत.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात भीमा नदीकिनारी असलेल्या वीजपंपांच्या केबल मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असून, या संकटामुळे शेतकरी पुरते वैतागले असून पोलिसांचा चोरांवर वचक नसल्याने चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.. हे चोर परिसरातीलच सरावलेले केबल चोर असण्याची शक्यता आहे.

कारण थ्री फेज विद्युत पुरवठा कधी बंद होतो व कधी विद्युत प्रवाह बंद असतो. त्याप्रमाणे ते केबलची चोरी करताहेत. पण हे ही खरे आहे की हे काम ज्याला वीजपंप व विजेचे काम करण्याची माहिती आहे. त्यांचे नाही कारण केबल चोरी करण्यासाठी चक्क दगडाचा वापर होत असून, दगडाने ठेचून केबल तोडून चोरी होते आहे, असे वाडा गावचे सरपंच रघुनाथ लांडगे यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने वाडा औटपोष्ट पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पाणीपुरवठा कर्मचारी तुकाराम सुपे यांनी ही फिर्याद दिली आहे.

वाडा ग्रामपंचायतीची केबल दोन महिन्यापूर्वी चोरीला गेली. त्यावेळी पोलिसांना खबर देवून नवीन केबल लावून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र चार दिवसांपूर्वी पुन्हा चोरीला गेली व ग्रामपंचायतीने पुन्हा केबल आणून पाणी पुरवठा सुरळीत केला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा केबल चोरीला गेल्याने सरावलेल्या चोरांना ग्रामपंचायत प्रशासन पुरते वैतागले आहे.
- मच्छिंद्र मस्के, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :Pune Newspune