राजगुरुनगरला सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगरला सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा
राजगुरुनगरला सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा

राजगुरुनगरला सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा

sakal_logo
By

चास, ता.१६ : राजगुरुनगर (ता. खेड) येथे सरपंच आणि ग्रामसेवकांची दोन दिवशीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने तालुकानिहाय पंचायत समितीच्या वतीने ''आमचा गाव..आमचा विकास'' या मोहिमेतंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
आगामी २०२३-२४ सालात १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे वर्ग होत असल्यामुळे आमचा गाव आमचा विकास या संकल्पना प्रत्यक्ष लोकोपयोगी विकासकामे करताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांचा आराखडा तयार करताना शाश्वत विकास ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, उपजीविकेसाठी आवश्यक शिक्षण, महिला सबलीकरण, मानवी जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार निर्मितीपर्याय आदी विषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
खेड, शिरोली, वराळे (ता. खेड) येथेही कार्यशाळांचे आयोजन केले. येथे सुमारे १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच-उपसरपंच उपस्थित होते. त्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, के.बी. नेहरे, वामन बाजारे, पंचायत विस्तार अधिकारी सुखदेव सांळुखे, एस.टी.भोकटे, गणेश शिंदे, बापू कारंडे आदींनी मार्गदर्शन केल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.


00378