भीमाशंकर देवस्थानच्या कारभाराची चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर देवस्थानच्या कारभाराची चौकशी करा
भीमाशंकर देवस्थानच्या कारभाराची चौकशी करा

भीमाशंकर देवस्थानच्या कारभाराची चौकशी करा

sakal_logo
By

----------
चास, ता. १८ ः बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पूजेचा हक्क, गुरव समाजावर होणारा अन्याय व देवस्थानच्या चुकीच्या कारभाराची चौकशी व्हावी म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या सेवा व पुजारी असलेल्या नागरिकांनी खेड तहसीलदार कार्यालयापुढे उपोषण आंदोलन केले.

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे गुरव पुजाऱ्यांना पूजेचे हक्क होते व आहेत, परंतु श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे व त्यांचे दोन बंधू, सहकारी हा हक्क मिळवून देत नाहीत, अधिकार मागितल्यास दादागिरी होते, मंदिरात येऊ दिले जात नाही. ‘भीमाशंकर आमच्या मालकीचे आहे,’ असे सांगितले जाते. असे आरोप करीत येथील पुजाऱ्यांनी खेड तहसीलदार कार्यालयापुढे उपोषण केले.

भीमाशंकर येथील वंचित गुरव समाजाचे शंकर कौदरे यांच्या नेतृत्वाखाली संतोष कौदरे, भाऊ कौदरे, कैलास कौदरे, नीलेश कौदरे, काळुराम कौदरे, रूपेश कौदरे, नवनाथ कौदरे, अजित कौदरे, विशाल शिर्के, अभय कौदरे, जगू कौदरे, शंकर मोहंडुळे, यशवंत कौदरे, रोहिदास कौदरे, रघुनाथ कौदरे, शिवराम कौदरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील, मंगल चांभारे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आंदोलकांनी त्यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले. सायंकाळी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी आंदोलकांशी कार्यालयात चर्चा केली, प्रश्न सामोपचाराने मिटवू, असे लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.
---------------------------------
भीमाशंकर येथे समाजाची धर्मशाळा पूर्वीपासूनच नाही, राजगुरुनगर येथे भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे कार्यालय, जागाही नाही, वि-हाम येथील देवस्थानच्या जमिनीत माझा कोणताही संबंध नाही, केवळ राजकीय हेतू ठेवून संबंधित व्यक्तींकडून सुपारी घेऊन मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. - सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान
---------------------------
राजगुरुनगर (ता. खेड) ः देवस्थानच्या चुकीच्या कारभाराच्या चौकशीची मागणीचे निवेदन देताना आंदोलनकर्ते.