अडीच लाखांच्या दागिन्यांची चासमधून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच लाखांच्या दागिन्यांची चासमधून चोरी
अडीच लाखांच्या दागिन्यांची चासमधून चोरी

अडीच लाखांच्या दागिन्यांची चासमधून चोरी

sakal_logo
By

चास, ता. २४ ः चास (ता. खेड) येथे घरातुन सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून, याबाबत सुरेखा लक्ष्मण मुळूक (रा. चास, ता. खेड) या महिलेने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चास येथील घरातील बेडरूममधील कपाटातून सोन्याचे मणी मंगळसुत्र, कानातील झुमके, दोन अंगठया, गळयातील सोन्याचे बदाम, नाकातील नथ असा दोन लाख ४६ हजार किमतीचा ऐवज चोरीला गेला असून, फिर्यादीच्या मुलीच्या मैत्रीणीवर दागिने चोरून नेल्याचा संशय असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले करीत आहे.