कडूस येथील छाप्यात चार जुगारींवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडूस येथील छाप्यात
चार जुगारींवर कारवाई
कडूस येथील छाप्यात चार जुगारींवर कारवाई

कडूस येथील छाप्यात चार जुगारींवर कारवाई

sakal_logo
By

चास, ता. ३ : कडूस (ता. खेड) येथील शांतीनगर येथे खेड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले असून, तीन हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शांतीनगर येथील वस्तीत सुरेश भगवान गायकवाड यांच्या घराच्या भिंतीचे आडोशाला सुरेश भगवान गायकवाड (वय ४९), दिलीप राजाराम नेहेरे (वय ४८), योगेश ज्ञानेश्र्वर लांडगे (वय ३५) व प्रदिप शंकर नाईकरे (वय २३, सर्व रा. कडुस), हे तीन पत्ती जुगार पैशावर खेळत असताना रोख रक्कम व जुगारीचे साहित्य असा एकुण ३४०० रूपयांच्या मालासह मिळुन आले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संदिप संभाजी चौधरी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.