कमान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट
कमान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट

कमान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट

sakal_logo
By

चास, ता.२० : शिरूर-भीमाशंकर राज्यमार्गावरील खेड तालुक्यातील राजगुरुनगर ते कमान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे. डांबराच्या साह्याने बुजवले असले तरी लगेच उखडले आहेत. काही ठिकाणी क्रश सॅंडने झाकले असले तरी काही ठिकाणी खड्डे जैसे थेच आहेत. खड्डे बुजवण्याचा निधी खड्ड्यात गेल्याची परिसरात चर्चा होत असून, निकृष्ट काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
रस्त्यावरील दहा खड्यांमधला एक बुजवून बाकी खड्डे तसेच सोडले जात असल्याची तक्रार आखरवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीचे सरपंच मोनिका मुळूक तसेच अन्य सदस्यांनी केली. त्या बाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे.

राजगुरुनगर ते कमान मार्गावरअनेक खड्डे बुजवण्यात आले नसून बुजवलेल्या खड्यांमध्ये डांबराचे प्रमाण नगण्य असल्याने काही वेळातच या खड्यांचे मुळ स्वरूप परत प्राप्त झाले आहे. काहीही खड्यांमध्ये फक्त ग्रीट टाकले आहे. त्यावरून वाहने गेल्यावर ते पूर्ण रस्त्यावर पांगले आहे. या शिवायडांबरांने भरलेल्या खड्यांवर रोलींगही केलेले नाही.

दुरुस्तीचे काम केल्याचा दिखावा
आखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मोनिका मुळूक तसेच ग्रामसेवक शरद शिरसाट व लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक यांनी बांधकाम विभाग खेड यांना पत्र देण्यात आले असून त्यामध्ये बरेचसे खड्डे बुजवले न जाता कामगार पुढे जात असून, प्रत्यक्षात रस्ता दुरूस्त केला नाही. फक्त कोगदोपत्री दुरूस्तीचे काम केल्याचा दिखावा केला जातो आहे. सदर कामाची पाहणी करून डांगडुजी चांगल्या प्रकारे करून दर्जेदार काम करून देण्याच्या सूचना ठेकेदाराला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
-----------------------

00434