वाडा येथे धरणातील लाटांमुळे खचतोय रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा येथे धरणातील लाटांमुळे खचतोय रस्ता
वाडा येथे धरणातील लाटांमुळे खचतोय रस्ता

वाडा येथे धरणातील लाटांमुळे खचतोय रस्ता

sakal_logo
By

चास, ता.२० : वाडा (ता. खेड) येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याला त्वरित संरक्षक भिंत बांधण्याची गरज असून, अरूंद रस्ताला लागूनच चास कमान धरणाच्या पाण्याचा फुगवटा (बॅक वॅाटर) असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. धरणातील पाण्याच्या लाटांनी दिवसेंदिवस स्मसानभूमीकडे जाणारा हा रस्ता खचत चालला असून फक्त एक चारचाकी वाहण जाईल एवढाच रस्ता शिल्लक राहिला आहे.

विस्थापीत गावांना अजुनही मृत्यूनंतरची वाटही सुखद राहिलेली नसल्याने विस्थापीत नागरिक आजही समस्यांनी ग्रासलेले आहेत. चास-कमान धरणामुळे विस्तापीत झालेले वाडा गाव आजही समस्यांनी ग्रासलेले असून मरणही सुखद राहिले नसल्याचे चित्र आहे. वाडा गावची स्मशानभूमी हि गावापासून जवळपास दिड ते दोन किलोमीटर लांब असून नाईलाजाने अंत्यविधीसाठी स्वर्गरथ व या रथाबरोबर बहुतांशी नागरिक चारचाकी वा दुचाकी घेवूनच येथे येत असतात. स्मशानभूमी हि चास कमान धरणाच्या बॅक वॅाटरमध्ये असून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पाण्याचा फुगवटा असलेल्या बाजुने जात आहे. या पाण्याच्या लाटांनी दिवसेंदिवस स्मसानभूमीकडे जाणारा हा रस्ता खचत चालला असून फक्त एक चारचाकी वाहण जाईल एवढाच रस्ता शिल्लक राहिला आहे. रात्री अपरात्री येथे अंत्यविधीचे कार्यक्रम होत असल्याने समोरासमोर वाहणे आल्यास किंवा रस्त्याचा अंदाज न आल्यास रात्रीच्या अंधारात वाहणे थेट जलाशयात कोसळण्याचा धोका आहे.

अंत्यविधीला येणाऱ्यांचाच अंत होण्याची शक्यता
वाडा येथे एका जागा मालकाने रस्त्याला समांतर दगडी भिंत घातल्याने अलीकडे वाहणे पलीकडे जाऊ शकत नाहीत. पर्यायाने या अरूंद रस्त्यावरून जिव मुठीत धरून अंत्यविधीला जावे लागते आहे. या गंभीर समसेची दखल घेत तातडीने या रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्याची गरज असून ती न घातल्यास अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांचा अंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

00436