चोरट्यांनी रोहित्रे फोडल्याने पांगरीत वीजपुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्यांनी रोहित्रे फोडल्याने
पांगरीत वीजपुरवठा खंडित
चोरट्यांनी रोहित्रे फोडल्याने पांगरीत वीजपुरवठा खंडित

चोरट्यांनी रोहित्रे फोडल्याने पांगरीत वीजपुरवठा खंडित

sakal_logo
By

चास, ता. २५ : पांगरी (ता. खेड) येथील बुट्टेवाडी फाट्यावर असलेली तीन विद्युत रोहित्रे (डीपी) अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा तसेच ऑइल चोरून नेले, यामुळे गावच्या शेतीपंपांसह पाणीपुरवठा स्कीमला असणारा विद्युतप्रवाह खंडित झाला असून, तातडीने नवीन रोहित्रे बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी उपसरपंच अमोल गाढवे यांनी केली आहे.

याबाबत उपसरपंच अमोल गाढवे, पोलिस पाटील गणेश तळेकर, रामकृष्ण मांजरे, दिनेश भोसले यांच्यासह अन्य नागरिकांनी बोलताना सांगितले, की यापूर्वीही या भागात मोटरच्या केबल चोरीला जाणे, विजेच्या मोटारी चोरीला जाणे असे प्रकार घडले आहेत. तसेच येथील विद्युत रोहित्रही एकदा चोरट्यांनी फोडले होते. मात्र तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता तिन्ही रोहित्रे चोरट्यांनी फोडल्याने बंद झाली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या कामाला, कांदा लागवड व अन्य पिकांच्या भरण्या प्रभावित झाल्या आहेत. तरी वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

या चोरीबाबत राजगुरुनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून, ऑइल व तांब्याच्या तारा मिळून सुमारे २१६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता. २५) सर्वप्रथम गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन रोहित्र बसवणार असून, येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांचाही वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- स्वाती पाटील, कनिष्ठ अभियंता, महावितरण