
कठोर प्रयत्न केल्यास सफलता : मुळूक
चास, ता.१२ : ''''प्रत्येक व्यक्ती जन्माने श्रीमंत नसते. कठोर प्रयत्न केल्यास सफलता मिळवून मोठे होता येते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनीही प्रतिकूल परिस्थितीत कठोर प्रयत्न केल्यास सफलता मिळेलच,'''' असे मत राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड. अरुण मुळूक यांनी व्यक्त केले.
डेहणे (ता. खेड) येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कायदेविषयक पार पडले. त्याचे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलने आयोजन केले होते.
शिबिरप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. दिलीप करंडे, खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नवनाथ गावडे, प्राध्यापक सरजीने, ॲड. अतुल गोरडे, ॲड. बिभीषण पडवळ, ॲड. माणिक वायाळ, ॲड. मनीषा टाकळकर, ॲड. शंकर कोबल, ॲड. अरुण मुळूक तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिरात ॲड. दिलीप करंडे यांनी विविध कायद्यांवर मार्गदर्शन केले. ॲड मनीषा टाकळकर यांनी महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड शंकर कोबल यांनी आदिवासींचे कायदे व योजना यावर मार्गदर्शन केले.
प्रा. महेश रानवडे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. नितीन काळे यांनी आभार मानले.
-------------------
00467