
नायकवडी, जवळेकर यांचा गाडा ठरला घाटाचा राजा
चास, ता. ४ ः बहिरवाडी (ता. खेड) येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवाचे दोन दिवसाचे आकर्षण ठरलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या दिवशी फायनल शर्यत किसनशेठ पोपटराव सोनवणे व दुसऱ्या दिवशी रामनाथ विष्णू वारिंगे यांच्या गाड्याने जिंकली तर घाटाचा राजा बहुमान विकास अंकुश नायकवडी व राजूशेठ वसंतराव जवळेकर यांच्या गाड्याने प्राप्त केले.
बहिरवाडी येथे उत्सवाची सुरूवात देवाला पहाटे अभिषेक व हारतुरे अर्पण करून झाली. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यतीत दोन दिवसांत तब्बल ४०० बैलगाडे धावले. त्यामध्ये पहिल्या दिवशी फळीफोड प्रथम क्रमांक दिवंगत मारुती रघुजी मुळे यांच्या गाड्याने, व्दितीय क्रमांक दिवंगत जयगणेश दत्तात्रेय नाईकरे यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक धर्मा बाबूराव चव्हाण यांच्या गाड्याने प्राप्त केला. फायनल शर्यतीत पहिल्यात पहिला क्रमांक किसनशेठ पोपटराव सोनवणे, दुसरा ओम गणेशनाना अरगडे, तृतीय क्रमांक रोहन शंकर भवारी तर चतुर्थ क्रमांक नवनाथ लक्ष्मण होले व वेद संभाजी राऊत यांच्या गाड्याने प्राप्त केला. तर घाटाचा राजा बहुमान विकास अंकुश नायकवाडी यांच्या गाड्याने मिळवला. दुसऱ्या दिवशी झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक विनोदशेठ शांताराम पाचारणे यांच्या गाड्याने, व्दितीय क्रमांक विकास अंकुश नायकवाडी यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक विलासशेठ विठ्ठल थोरात यांच्या गाड्याने प्राप्त केला. फायनल शर्यतीत प्रथम क्रमांक रामनाथ विष्णू वारिंगे, व्दितीय क्रमांक राजूशेठ वसंतराव जवळेकर, तृतीय क्रमांक अरुण पोपट शिंदे तर चतुर्थ क्रमांक बोधलेबुवा महाराज बैलगाडा संघटना यांच्या गाड्याने प्राप्त केला. घाटाचा राजा बहुमान राजूशेठ वसंतराव जवळेकर यांच्या गाड्याने मिळवला. बैलगाडा घाटात अनाउन्सर म्हणून पंकज शिंदे, माऊली तळेकर, माऊली पिंगळे, संतोष खेंगले, साहेबराव आढळराव, शिवाजी कावडे, सागर साळुंखे, लक्ष्मण बांगर यांनी काम पाहिले. बैलगाडा शर्यतींदरम्यान ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र केसरी पहिलवान शिवराज काळुराम राक्षे याचा नागरी सत्कार करण्यात आला.
यात्रेमध्ये आमदार दिलीपराव मोहिते पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाबा राक्षे यात्रेस उपस्थित होते. या उत्सवाचे संपूर्ण नियोजन युवा सभापती अंकुशभाऊ राक्षे, सरपंच वसुधा राक्षे, उपसरपंच बाजीराव राक्षे, माजी सरपंच जगन्नाथ राक्षे, नीतेश राक्षे, सचिन राक्षे, निवृत्ती राक्षे, कैलास शेडाणे, बाळासाहेब राक्षे, बारकू वाघुले, भिकुशेठ बोऱ्हाडे, रामदास शेडाणे, रामदास राक्षे, वैभव दत्तात्रेय राक्षे, दशरथ शेडाणे तसेच समस्त ग्रामस्थ बहिरवाडी, मुंबईकर व पुणेकर मंडळी, ग्रामपंचायत बहिरवाडी, युवा सभापती अंकुशभाऊ राक्षे युवा मंच, भैरवनाथ तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, भैरवनाथ यात्रा कमिटी यांच्यावतीने करण्यात आले होते.