खेडच्या पश्चिम पट्यात महाशिवरात्री उत्साहात

खेडच्या पश्चिम पट्यात महाशिवरात्री उत्साहात

चास, ता. १९ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवमंदिरात नागरिकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठा गर्दी केली होती. चास येथील पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिर, कान्हेवाडी येथील शंकराचे मंदिर, बिबी येथील डोंगरावर वसलेले शंभो महादेवाचे मंदिर व वाडा येथील भीमाशंकरच्या मंदिरात गर्दी होती.
श्री क्षेत्र चास येथील पेशवेकालीन श्री सोमेश्र्वर मंदिरात पवित्र शिवलिंगावर रुद्राभिषेक सुरेश चासकर, सुहासचंद्र दस्तुरे, देवेंद्र पाटणकर, अनिल जोशी, अजिंक्य पाटणकर, कुमार साठे, सुधीर चासकर यांच्या हस्ते झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनास खुले करण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, संदीप घनवट यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित होते. माजी सरपंच अनिल टोके, गणेश टोके, अॅड. रोहन होगले, सुभाष रासकर यांच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नारायण मंदिरातील विश्र्वनाथाच्या हरिहरेश्र्वराच्या शिवलिंगावर मंदिराचे विश्र्वस्त देवेंद्र पाटणकर, अपर्णा पाटणकर यांनी अभिषेक केला. कान्हेवाडी येथील श्री 1008 यती राजराजेश्र्वरानंद शास्त्रीजी महाराज यांच्या मठात उत्सव मोठ्या स्वरूपात पार पडला. तसेच बिबी येथील पुरातन असलेल्या अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या श्री शंभु महादेवाच्या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथे सकाळी शिवलिंगावर अरुण अण्णा गुंडाळ, उपसरपंच सतीश जैद, बाबूराव भोर, संतोष भोर, रवी राखुंडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. वाडा गावातील श्री भीमाशंकरच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथे उपसरपंच रोहिदास शेटे, शिवरामबुवा पावडे, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब सासवडे, राम भागवत, भरत केदारी, सुदाम घनवट, बाळासाहेब राजगुरव, देवराम शेटे यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला.
00625

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com