भोरगड किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरगड किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा
भोरगड किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा

भोरगड किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा

sakal_logo
By

चास, ता.२६ : दुर्गसंवर्धन कार्यात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था व किल्ले भोरगिरी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्गापूजा सोहळा भोरगिरी (ता.खेड) येथील भोरगिरीच्या भोरगड किल्ल्यावर रविवारी (ता. २६) उत्साहात पार पडला.
शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे सत्ताविसावे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतातील एकूण १४१ हुन अधिक गड-किल्ल्यांवर एकाचवेळी विविध सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक दुर्गपूजा करण्यात आली.
शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर, सूर्याजी पिसाळ यांचे चौदावे वंशज ऋषीकेश पिसाळ व घोडेगावचे ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे यांच्या हस्ते भोरगिरी किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या शिवमंदिरात ही ऐतिहासिक दुर्गापूजा संपन्न झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर काळे, आशिष फलके यांसह शिवप्रेमी व दुर्गप्रेमी उपस्थित होते.
दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी, सर्वसामान्य नागरिक व शिवभक्त गड-किल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत, प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर उपस्थित राहावेत, त्यांना गड-किल्ले पाहण्याची व त्यातून नंतर त्यांच्यात दुर्गसंवर्धनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी विविध गड-किल्यांवर दुर्गपूजा केली जाते, साधारणपणे जानेवारी महिन्यात गड-किल्यांवरील गवत सुकण्यास सुरुवात होते. तर फेब्रुवारी महिन्यात गवत पूर्ण सुकून जाते, किल्ल्यांवरील गवत सुकल्यामुळे दुर्ग संवर्धनाची कामे करणे सोपे जाते, त्यामुळे शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वत्र दुर्गपूजा करून गड-किल्ल्यांवरील दुर्गसंवर्धन कामास सुरुवात केली जाते, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली.
..........................
00656