वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

sakal_logo
By

चास, ता. २७ : वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पिंपरी चिंचवडचे प्रशासन अधिकारी व खेड तालुक्यात गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले संजय नाईकडे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कान्हेवाडीची ठाकरवाडी व सहाणेवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
शनिवारी (ता. २५) संजय नाईकडे यांनी आपला मुलगा आशुतोष याच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेवाडीची ठाकरवाडी व सहाणेवाडी शाळेतील ५१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यामध्ये स्पोर्ट्स ड्रेस, शूज व शैक्षणिक साहित्य याचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नथू पारधी, आदर्श ग्राम कान्हेवाडीचे प्रगतशील शेतकरी विलास कोबल, दत्तात्रेय कोबल, ज्ञानेश्वर पारधी, सुनील मधे, दत्ता केदारी, ठाकरवाडी कान्हेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय घुमटकर, शंकर बुरसे, वैजयंता नाईकडे, गोरक्ष मुळुक व ग्रामस्थ उपस्थित होते.