चासमधील विज्ञान मेळाव्यात १५० विद्यार्थ्यांचा सहभाग
चास येथ रामन यांच्या प्रतिमेचे पूजन

चासमधील विज्ञान मेळाव्यात १५० विद्यार्थ्यांचा सहभाग चास येथ रामन यांच्या प्रतिमेचे पूजन

चास, ता. १: येथील (ता. खेड) रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या विज्ञान मेळाव्यात १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पर्यवेक्षक किशोर जगताप यांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर मुख्याध्यापक विनायक निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी राजशेखर वाघमारे, महेश सुरवसे, विलास लोखंडे, राकेश ठोकळ, कपिल तिरपुडे, गीता बागल, कविता जोशी, कीर्ती गंभीर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर जगताप यांनी प्रकाश किरणांच्या मार्गात येणाऱ्या रेणूंमुळे त्याचे विचलन होऊन तरंगलांबीत बदल होतो, याबाबत मार्गदर्शन केले. कपिल तिरपुडे यांनी अलौकिक बुद्धिमत्तेचे रामन यांच्या संशोधनाने द्रव आणि वायू माध्यमातील प्रकाशाच्या विकिरणासंदर्भाची माहिती विशद केली.
सूत्रसंचालन विद्यालयाचे विज्ञान प्रमुख राजशेखर वाघमारे यांनी केले तर आभार विलास लोखंडे यांनी मानले.
-------------------------
00682

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com