डेहणे येथे आवश्‍यक दाखल्यांसाठी मेळावा

डेहणे येथे आवश्‍यक दाखल्यांसाठी मेळावा

चास, ता.१ : डेहणे (ता. खेड) येथे अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांना आवश्‍यक विविध दाखल्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी खेड तालुक्यातील तीनशेहून अधिक नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घेतला.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव व तहसील कार्यालय खेड यांच्या माध्यमातून बिरसा ब्रिगेड खेड तालुका यांच्या सहकार्यातून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांना गरजेच्या असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड, पॅन कार्ड, प्रतिज्ञापत्र काढून देण्यात आले. शिबिरात विविध प्रकारच्या दाखल्यासाठी नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी सर्व बिरसा ब्रिगेड आणि आदिवासी विचारमंच समन्वयक यांचे मोलाचे योगदान लाभले.
मेळाव्यास तहसील कार्यालय खेडचे कर्मचारी दत्ता ठोकळ, स्वप्नील जैद यांच्यासह आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव विस्तार अधिकारी माळी, महा ई सेवा केंद्राच्या स्वाती येवले, परिसरातील सर्वच गावांतील तलाठी तसेच कोतवाल उपस्थित होते.
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तलाठी कोठवळ, शिंदे, तसेच देवकर या सर्वाचे मोलाचे योगदान लाभले. शिबिर यशस्वी होण्यासाठी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष सुपे, रोहित ठोकळ, कृष्णा वाजे, काशिनाथ वाघ, अशोक लांघी, योगेश शिंगाडे, रोहन भोकटे, नितीन सुरकुले, अक्षय लांघी, महेंद्र लांघी, किरण विरणक यांनी विशेष योगदान दिले.
---------------------
राजेंद्र लोथेः चास फोटोःCHS01 P1
----------------------
00684

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com