वाडा येथील वळणावर झुडपांमुळे धोका

वाडा येथील वळणावर झुडपांमुळे धोका

चास, ता. ११ : वाडा (ता. खेड) येथील माळी वस्तीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावरील झुडपे वाढली आहेत. ती वाहतुकीस अडथळा ठरत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे ती तातडीने काढण्याची मागणी स्थानिक तसेच वाहनचालकांकडून होत आहे.

शिरूर-भीमाशंकर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेला असून, या रस्त्यावर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या मार्गावर खेड तालुक्यात वाडा येथे माळी वस्तीजवळ धोकादायक वळण असून, या धोकादायक वळणावर साइडपट्यावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे तसेच गवत उगवलेले आहे. शिवाय या झुडपांना लागूनच मोठा खड्डा असल्याने अधिक धोकादायक आहे. आधीच वळण त्यात झुडपांमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने आत्तापर्यंत येथे छोटे मोठे अपघात घडलेले आहेत. मात्र, आता उन्हाळा सुरू झाला असून लवकरच शाळांना सुट्या पडणार आहेत. यामुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढणार आहे. या रस्त्यावरील वाहतूकही वाढणार आहे. वाढलेल्या वाहतुकीमुळे या वळणावर समोरच्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने ही झुडपे काढून वाहतुकीसाठी हे वळण सुरक्षित करपण्याची मागणी वाडा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मोरे, किरण हुंडारे, भगवान लांडगे यांसह वाहतुकदारांकडून करण्यात येत आहे.


शिरूर-भीमाशंकर हा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करण्यात आली असून, तातडीने हा भाग स्वच्छ करण्याबरोबरच वाहतुकीस अडथळे ठरणारी अन्य ठिकाणी असणारी झुडपेही काढण्याबाबत नियोजन केले आहे. लवकरच त्या सर्व ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात येईल.
- राम जाधव, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग


वाडा (ता. खेड) : माळी वस्तीजवळील वळणावर धोकादायक पद्धतीने वाढलेली झुडपे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com