चास येथे नेत्र तपासणीचा १२५ जणांनी घेतला लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चास येथे नेत्र तपासणीचा १२५ जणांनी घेतला लाभ
चास येथे नेत्र तपासणीचा १२५ जणांनी घेतला लाभ

चास येथे नेत्र तपासणीचा १२५ जणांनी घेतला लाभ

sakal_logo
By

चास, ता. ९ : येथे (ता. खेड) संजुभाऊ घनवट युवा मंच व डॅा. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ९) नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप करण्यात आले. शिबिराचा सुमारे १२५ जणांनी लाभ घेतला.
ग्रामीण भागात आजही डोळ्यांच्या उपचारासाठी किंवा त्रास होत असतानाही डोळ्याच्या उपचारासाठी खास करून नागरिक दवाखान्यात जात नाही हे सत्य आहे. या पार्श्वभूमीवर चास येथे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्‌घाटन संजय घनवट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी चासचे सरपंच विनायक मुळूक, कमानचे योगेश नाईकरे, सदस्य संदीप ढमढेरे, सुनील वाळुंज, आशा टोके तसेच वैभव राक्षे, बाळू बुटे, फाउंडेशनचे डॅा. सूरज सदाशिव, डॅा. अभिजित कुलकर्णी, रवींद्र कानडे, संदीप शिरतर, नवनाथ वाळुंज, मच्छिंद्र टोके, निलम मुळूक, ग्रामसेवक एस. के. ढोरे, रामभाऊ नाईकरे, रंगनाथ ढमढेरे, आबा गायकवाड यांसह नागरिक उपस्थित होते.
00717