
गुंडाळवाडी येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक
चास, ता. १२ : गुंडाळवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेत दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेली मिरवणूक आकर्षण ठरली. बालगोपाळांनी केलेल्या पारंपरिक वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधत होत्या.
गुंडाळवाडी येथे शिवजयंती नेहमीच उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहाने शिवनेरी ते गुंडाळवाडी अशी दौडीने शिवज्योत आणली. शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विविध सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला, भाषण स्पर्धा, कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या. असे कार्यक्रम पार पडल्यावर शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. अश्विनी कुडेकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडाळवाडी येथील मुलांचा गौरव शिवजयंती उत्सव समिती गुडाळवाडीच्या वतीने करण्यात आला.