बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी निधी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी निधी द्या
बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी निधी द्या

बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी निधी द्या

sakal_logo
By

चास, ता.१६ : चास-कमान धरणाअंतर्गत बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील नऊ गावांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा हा चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असून, साधारण जानेवारी महिन्यापासून चास कमान धरणातून कालव्याव्दारे पाण्याचे आवर्तन सुरू होते व टप्याटप्याने पाणलोट क्षेत्रातील गांवामध्ये भीमा नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात येतो. नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात आल्यावर नदीपात्रात असणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींचेही पाणी संपुष्टात येते व गावोगावी पाणीटंचाई सुरू होते ही गेली पंचवीस ते अठ्ठावीस वर्षातील परिस्थिती आहे. यासाठी एकमेव पर्याय म्हणजे धरणांतर्गत बुडीत बंधारे घेणे गरजेचे असून, तशी या पट्यातील ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. ग्रामस्थांच्या या मागणीबाबत ''सकाळ''ने वेळोवेळी आवाज उठवून व टंचाईचे सचित्र वार्तांकन केले आहे.
दरम्यान, या मागणीसाठी नुकतेच खेडच्या पश्चिम पट्यातील धुवोली, वांजळे, शिरगाव, मोरोशी, नायफड, एकलहरे, धामणगाव, टोकावडे, मंदोशी या आठ ते नऊ गावचे ठराव एकत्र करून सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देताना पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिवसेनेचे (शिंदे गट) पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, धुवोली/ वांजळेचे माजी सरपंच पांडुरंग जठार, शरद जठार, धामणगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर भांगे, मोरोशीच्या सरपंच जयश्री नांगरे, शिरगाव मंदोशीचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ठोसर, नायफडचे ग्रामपंचायत सदस्य सुनील मिलखे, रोहिदास भाईक, शंकर भागीत, ज्ञानदेव जठार, पवन थोरात उपस्थित होते.