
कुंडमाऊलीच्या उत्सवानिमित्त हारतुऱ्यांची मिरवणूक
चास, ता. २५ ः चास (ता. खेड) येथे श्री कुंडमाऊली देवीचा उत्सव उत्साहात साजरा झाला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पारंपारिक वाद्याच्या तालावर देवीसाठी हारतुऱ्यांची निघालेली मिरवणूक आकर्षणाचा विषय ठरली.
श्री कुंडमाऊली देवीचा उत्सव चास व पंचक्रोशीच्या वतीने सुरू करण्यात आला. सकाळी देवीच्या मूर्तीस अभिषेक झाल्यावर, हार तुरे चास गावामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने नेवून देवीला अर्पण करण्यात आले.
यावेळी समस्त ग्रामस्थ चास व पंचक्रोशी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट, उद्योजक संदीप घनवट, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल टोके, उपाध्यक्ष अविनाश मुळूक, सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच जावेद इनामदार, संदीप ढमढेरे, राजेंद्र घाटकर, सोसायटीचे उपाध्यक्ष मच्छिंद्र मुळूक, अनिल रहाणे, नवनाथ वाळुंज, अंकुश रासकर, समाधान टोके, मच्छिंद्र टोके, राहुल टोके, अशोक मुळूक, बाळासाहेब बुटे, आशा टोके, सविता रहाणे, पोलिस पाटील वंदना रासकर यांसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
देवीच्या मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट व लाइट व्यवस्था संदीप घनवट यांनी केली होती. अनिल टोके यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. कुंडमाऊली प्रतिष्ठानच्या वतीने सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये दत्तात्रेय रासकर, मारुती शिंदे, बाळू देवकर, दादाभाऊ गायकवाड व दत्तात्रेय कांबळे यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायंकाळी समस्त कोळी समाज, यात्रा कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ चास व पंचक्रोशी यांच्या वतीने देवीचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दादा ढमाले यांच्या सौजन्याने ढोल लेझीमच्या तालावर व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेला देवीचा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेनंतर मंदिराच्या प्रांगणात विसावला.