धुवोली येथील जठार परिवाराचे मोहिते पाटील यांच्याकडून सांत्वन

धुवोली येथील जठार परिवाराचे मोहिते पाटील यांच्याकडून सांत्वन

चास, ता.२८ : ''''जठार परिवारावर झालेला आघात हा सहन करण्याच्या पलीकडचा आहे. जठार परिवाराला सर्वतोपरी मदत करणार असून, बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या अजयच्या भावाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे,'''' प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.

धुवोली (ता. खेड) येथे ता. १७ मार्च रोजी सतरा वर्षांचा महाविद्यालयीन युवक अजय चिंतामण जठार हा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्याच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदतही देण्यात आली. मात्र, या घटनेच्या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील हे मुंबई येथे अधिवेशनात असल्याने त्यांना जठार परिवाराच्या दुःखात सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे शनिवारी (ता. २५) आमदार मोहिते यांनी धुवोली येथे जठार परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विनायक घुमटकर, माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी उपसभापती सुरेश शिंदे, डेहणेचे सरपंच दत्ता खाडे, महिला अध्यक्षा सुजाता पचपिंड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

00777

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com