चास येथे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चास येथे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन
चास येथे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन

चास येथे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन

sakal_logo
By

चास, ता. ३० ः चास येथील कुंडमाऊली देवीच्या यात्रा उत्सवात तीन दिवस नामवंत कीर्तनकारांच्या किर्तनसेवा ठेवत एक आगळा-वेगळा उत्सव चास व पंचक्रोशीने साजरा केला. मनोरंजनाच्या कार्यक्रमात होणारा गोंधळ, भांडणे व हाणामाऱ्या टाळून यात्रा उत्सव आनंदात साजरा व्हावा या दृष्टिकोनातून या यात्रेत यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ चास, आखरवाडी, मिरजेवाडी, घनवटवाडी व पंचक्रोशी तसेच यात्रा उत्सवाचे प्रमुख संजय घनवट व संदीप घनवट यांनी आगळावेगळा उपक्रम साजरा करताना यात्रेच्या रात्री नागरिकांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच समाजप्रबोधन होण्यासाठी कीर्तन ठेवण्याचा निर्णय घेतला व तो संमतही झाला. कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत किर्तनरूपी सेवा ठेवून समाज प्रबोधनाचा केलेला एक चांगला प्रयत्न असून हा प्रयत्न असाच चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक वर्षीच्या यात्रेत जो पर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत चास गावच्या कुंडमाऊलीच्या यात्रेत मोफत किर्तनसेवा करणार असल्याचे जाहीर केले.
गणेश महाराज वारंगे यांनी आपल्या कीर्तनात गावाच्या उपक्रमाचे कौतुक करताना हा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा असून गावांमध्ये नंदनवन फुलवल्याचा भास होत असल्याचे ते म्हणाले. तर समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या कीर्तनात विशेष गौरव करत पेशवेकालीन वैभव असलेल्या चास गावचा जिल्ह्यासह देशात हा असा सोहळा पहिल्यांदाच पाहत असून यात्रेत किर्तनसेवा हा अनोखा उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे असे म्हटले. या पुढील कुंडमाऊलीच्या प्रत्येक यात्रा उत्सवात मनोरंजनापेक्षा प्रबोधनावर भर राहील, असे उपतालुकाप्रमुख (ठाकरे गट) संजय घनवट तसेच उद्योजक संदीप घनवट यांनी सांगितले.