पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात
पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

चास, ता. ३१ ः पेशवेकालीन वैभव असलेल्या चास (ता. खेड) येथील सोमेश्र्वर मंदिराच्या नूतनीकरणाचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हभप गणेशमहाराज घोडके यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेने कार्यक्रमाची सांगता झाली.

दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या संकल्पनेतील पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार व परिसराला नयनरम्य स्वरूप प्राप्त करून दिले ते शिवसेनेचे (ठाकरे गट) उपतालुका प्रमुख संजय घनवट, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी. सोमेश्र्वर मंदिर व परिसरातील मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संप्पन्न होऊन सोमवार (ता. २७) रोजी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मंदिर व परिसराला उद्योजक संदीप घनवट यांच्या माध्यमातून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराबरोबरच परिसरातील झाडेही झगमगून गेली होती.

वर्धापन दिनाचे औचित्य साधत सकाळी अभिषेक सोहळा पुजारी सुहासचंद्र दस्तुरे यांच्या मंत्रघोषात पार पडला. सकाळी दहा वाजल्यापासून निमंत्रित भजनाच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सुमारे पंधरा भजनाच्या संघांनी सहभाग घेतला. त्यासाठी पंच म्हणून दादाभाऊ तनपुरे, पोपट शिंदे व मनोहर भोसले यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन समस्त ग्रामस्थ, चास, आखरवाडी, मिरजेवाडी, घनवटवाडी पंचक्रोशी, उद्योजक संदीप घनवट, अनिल टोके, सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच जावेद इनामदार, सुनील वाळुंज, नवनाथ वाळुंज, कांताराम ढमढेरे, नवनाथ रासकर, दत्तात्रेय मुळुक, सुभाष रासकर, नितीन रासकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आले.

------------------