खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील बाजरी फुलोऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील बाजरी फुलोऱ्यात
खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील बाजरी फुलोऱ्यात

खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील बाजरी फुलोऱ्यात

sakal_logo
By

चास, ता.२७ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात उन्हाळी बाजरीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते यामुळे गेल्या काही वर्षात या पिकाचे क्षेत्र तब्बल १८६.७० हेक्टरवर गेले आहे.
बाजरी हे पीक तसे खरीप हंगामातील पीक. मात्र पावसाळ्यात अनिश्चित पडणारा पाऊस, त्यातच कधी मुसळधार तर कधी पंधरा पंधरा दिवस पावसाची दडी. यामुळे बाजरीच्या पिकापासून शाश्वत असे उत्पन्न मिळत नाही. या शिवाय खेडचा पश्चिम पट्टा हा अतिवृष्टीचा असल्याने या भागात पावसाळ्यात बाजरीचे पीक शक्यच नसल्याने या भागात बाजरीचे पीक घेतले जात नव्हते. मात्र, चास कमान धरणाच्या पाण्यामुळे या पट्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिके घेणे शक्य झाल्याने गेली काही वर्षापासून उन्हाळी बाजरीच्या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळालेला दिसून येत आहे. उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा अपवाद वगळल्यास पिकावर कोणत्याही रोगाची मात्रा होत नाही त्यामुळे औषध फवारणी करावी लागत नाही, पाण्याची उपलब्धता असल्याने पाण्या व्यतिरिक्त पिकाला सहसा कोणत्या अतिरिक्त खर्चाची गरज लागत नसल्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते शिवाय चांगले अर्थार्जनही होते.

उन्हाळ्यात बाजरीचे पीक आमच्याकडे हमखास येत असून अवकाळी पावसाचा तडाखा न बसल्यास पिकातून चांगले उत्पन्न मिळते. पावसाळ्यात शंभर टक्के भाताच्या लागवडी होत असल्यातरी उन्हाळ्यात सर्वच ठिकाणी आता उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते कारण बाजरीमुळे वर्षभराच्या धान्याची चिंता मिटतेच. या शिवाय बाजरीचा बाजारभाव चांगला असल्याने पैसेही मिळतात.
- बाळासाहेब गोपाळे, प्रगतशील शेतकरी, चिखलगाव

उन्हाळ्यात दरवर्षी खेडच्या पश्चिम पट्यात उन्हाळी बाजरीचा चढता आलेख असून चालू वर्षी हे क्षेत्र तब्बल १८६.७० हेक्टरवर गेले आहे, मागील वर्षी हे क्षेत्र १२५ हेक्टर एवढे होते.
- संदीप आहेर, कृषी सहायक, चास
00873