चास येथे शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिके सादर

चास येथे शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिके सादर

चास, ता. ३० : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, पुणे आयोजित छत्रपती संघर्ष मर्दानी आखाडा अंतर्गत युद्ध कला प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, अग्निचक्र अशा अनेक कलेच्या खेळांचा समावेश होता.
जुन्नर येथील वस्ताद आकाश फुलपगार, रिया फुलपगार व सिद्धी चवरे यांच्या वतीने शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये तीन वर्षाच्या मुलाने अग्निचक्र फिरवून चास ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण केला. तर, अनेक लहान विद्यार्थ्यांसह मुलांनी विविध प्रात्याक्षिके दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली.
याप्रसंगी विश्वास राखुंडे, निखिल कोबल, ओंकार मेदगे, ऋषिकेश शेलार, संदीप काळे, मंगेश बोंबले, अमोल नाईकरे, दत्ता नाईकरे, अभिजित शिंदे, सतीष टोके, अमोल रासकर, कुलदीप घनवट, विनायक गायकवाड, सनी घाटकर, राहुल घनवट, आदी धारकरी उपस्थित होते. दरम्यान, युद्धकलांचे प्रशिक्षण चास येथे सोमवार (ता. १) पासून देण्यात येणार आहे.
ंंंssociated Media Ids : CHS23B00887, CHS23B00888

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com