नियोजन करून सोयाबीनचे उत्पादन वाढवा : मराडे

नियोजन करून सोयाबीनचे उत्पादन वाढवा : मराडे

चास, ता.१९ : ''सोयाबीन पीक शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. शेतकऱ्यांनी मशागतीपासून ते विक्रीपर्यंत व्यवस्थित नियोजन करून सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवावे,'' असे आवाहन वाडा मंडळचे मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब मराडे केले.
बुरसेवाडी (ता. खेड) येथे खेड तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विवीध मंडळमध्ये खरिप हंगाम पूर्व तयारीसाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत पूर्व तयारी अंतर्गत बीज प्रक्रिया मोहीम, योग्य बियाणांची निवड, उगवन क्षमता चाचणी आणि हुमणी कीड नियंत्रण मोहीम या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ अधिकारी भाऊसाहेब मराडे, कृषी सहायक दिगंबर डोलारे, लाडके यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी बिबीग्राम विवीध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष कैलास आसवले, संचालक साईनाथ चंद्रावळे, पंडित बुरसे, हरिभाऊ रोडे, गुलाब रोडे, रामदास इचके, रामदास चंद्रावळे, खंडू रोडे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
कैलास आसवले यांनी सूत्रसंचालन तर आभार साईनाथ चंद्रावळे यांनी मानले.

00914

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com