चासमध्ये रंगला देवांच्या मूर्तीचा मिरवणूक सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चासमध्ये रंगला देवांच्या मूर्तीचा मिरवणूक सोहळा
चासमध्ये रंगला देवांच्या मूर्तीचा मिरवणूक सोहळा

चासमध्ये रंगला देवांच्या मूर्तीचा मिरवणूक सोहळा

sakal_logo
By

चास, ता.३० : श्री क्षेत्र चास (ता. खेड) येथील श्री म्हातोबा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फुलांनी सजविलेल्या पालखी रविवारी (ता. २८) म्हातोबा, जोगेश्र्वरी, गणपती, स्वामी समर्थ, गुरूदत्त देवांच्या मूर्ती ठेवण्यात आली होती.यावेळी काढण्यात आलेल्या कलशाची मिरवणूक सोहळा रंगला. त्यात पंचक्रोशीतील भाविक सहभागी झाले होते.

म्हातोबा मंदिराच्या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी समस्त मुळूक परिवार आखरवाडी, गुंजवठा तसेच वाकड, हिंजवडी येथील नागरिकांनी तसेच योगदान युवा नेते संदीप मुळूक यांनी
योगदान दिले होते. जीर्णोद्धारास एक वर्ष पूर्ण झाल्याने मंदिराचा वर्धापनदिन साजराही करण्यात आला. मंदिरात पहाटे धार्मिक विधी पार पडल्यावर पुरोहितांच्या वाणीतून संकल्प मंत्रोच्चाव्दारे धार्मिक विधी, होमहवन व मूर्तीस्नानानंतर पूजा पार पडली.
हिंजवडी, वाकड ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडहून बाळासाहेब गुरव यांच्या हस्ते आणलेल्या श्री म्हातोबा देवाची पालखी आखरवाडी येथे आल्यावर स्वागत करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत ढोल ताशा, आळंदीतील भजनी मंडळे, फुलांनी सजविलेली पालखी व त्यामध्ये मुर्ती व कलश यां ताफ्यासह मिरवणुकीच्या अग्रभागी दत्तात्रेय मुळूक, गणपत मुळूक, निवृत्त पोलिस निरीक्षक मुरलीधर मुळूक, के. बी. मुळूक, विठ्ठल विष्णू मुळूक, कुशाभाऊ मुळूक, नामदेव तनपुरे, प्रा. सुरेश मुळूक, समीर मुळूक, गोविंद मुळूक, अमर मुळूक, भानुदास मुळूक, नथुराम मुळूक, विठ्ठल पंढरिनाथ मुळूक, शिवाजी मुळूक, ज्ञानेश्र्वर मुळूक, बबन मुळूक, अॅड. अरुण मुळूक यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संगीत भजनाच्या कार्यक्रमाने उत्सवात रंगत आणली. रात्री सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या कीर्तनाचा सोहळा पार पडला. नियोजन म्हातोबा देवस्थान कमिटी, समस्त ग्रामस्थ चास व पंचक्रोशी, सर्व बचत गट, महिला बचत गट, तरुण मंडळे यांच्या वतीने करण्यात आले.
--------------------
00925