नाईकरे कुटुंबीयांनी घातला ''पवळी''चा दशक्रिया विधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईकरे कुटुंबीयांनी घातला ''पवळी''चा दशक्रिया विधी
नाईकरे कुटुंबीयांनी घातला ''पवळी''चा दशक्रिया विधी

नाईकरे कुटुंबीयांनी घातला ''पवळी''चा दशक्रिया विधी

sakal_logo
By

चास, ता.३ : कमान (ता. खेड) येथील अनंथा गोपाळ नाईकरे यांनी आपल्या लाडक्या पवळी नावाच्या लाडक्या गायीच्या मृत्यूनंतर तिचा चक्क दशक्रिया विधी घातला.. या दिवशी महाराजांचे प्रवचन आयोजित केले होते. नाईकरे कुटुंबीयांनी पिंडदान करून अन्नदान करत त्या मुक्या प्राण्याविषयी आपली निष्ठा व्यक्त केली.
शेतकरी आपल्या पशुधनाची मुलाप्रमाणे जपणूक कतो. त्याला वाढवतात व काही दिवसांतच हा प्राणी त्या घराचा एक सदस्यच होऊन राहतो. त्याचाच प्रत्यय आला. तो कमान येथील बारापाटी वस्तीवर येथील जवळपास तीस वर्ष अनंथा नाईकरे यांच्या कुटुंबातील सदस्य राहिलेली पवळी ही गाय होती. तिचा मृत्यू २२ मे रोजी झाल्यावर या तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नाईकरे कुटुंबीयांनी आपल्या घरातील एक सदस्य मृत्यू पावल्यावर जसे विधी होतात तसे तिचे सर्व विधी केले. फ्केक्स लावून दशक्रिया विधी केला. अशोक महाराज सांडभोर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करून व पैपाहूण्यांना जेवणही घातले. या कार्यक्रमाला नागरिकांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
नाईकरे कुटुंबाने केलेला हा कार्यक्रम खेडच्या पश्चिम पट्टयात चर्चेचा विषय बनला आहे. दशक्रिया विधीसाठी माजी सरपंच योगेश नाईकरे, सोसायटीचे संचालक मारुती नाईकरे, राष्ट्रवादीचे वैभव नाईकरे, एकनाथ नाईकरे, सोमनाथ नाईकरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईकरे, दत्तात्रेय नाईकरे, नीलेश नाईकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------------
00938