
बिबी येथे सात पोती प्लास्टिकचे संकलन
चास, ता.७ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिबी (ता. खेड) येथील वनपरिमंडळमध्ये श्री शंभू महादेव मंदिर परिसरात वनविभागार्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे सात पोती प्लास्टिक जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती वनपाल गिरीष कुलकर्णी यांनी दिली.
राजगुरुनगर वन विभाग व या वनविभागाचा वनपरिमंडळ बिबी व ग्रामपंचायत बिबी-गुंडाळवाडी व बुरसेवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीच्या अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.
तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले बिबी येथील डोंगरावर वसलेले श्री शंभो महादेवाचे मंदिर कि ज्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी १७ व्या शतकात केला होता. त्या शंभो महादेवाचा परिसर व डोंगराच्या पायथा स्वच्छ करण्यात आला. सदर अभियानात वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष महेश राखुंडे, गावच्या सरपंच फासाबाई चतुर, उपसरपंच सतीश जैद, ग्रामपंचायत सदस्या सुजाता भोर, संगीता तनपुरे, चंद्रकांत भोर, सागर भोर, संतोष भोर, रवी बुरसे, सोसायटीचे उपाध्यक्ष कैलास असावले, हरी रोडे, बबन सातपुते, चंद्रकांत डोंगरे, दिनकर जैद, वनपाल गिरीश कुलकर्णी, वनरक्षक एम. एम. साबळे, एम. आर. शेळके, के. के. दाभाडे, वनसेवक डी. बी. बुरसे, गणेश कडाळे यांनी सहभाग घेतला.
00966