माळवाडी स्मशानभूमीत झाडांची लागवड

माळवाडी स्मशानभूमीत झाडांची लागवड

Published on

खोडद, ता. २० : खोडद (ता. जुन्नर) येथील माळवाडी मळ्यातील स्मशानभूमीत रविवारी (ता. २०) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे ६० देशी कुळातील झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासाठी श्री अंबिका पतसंस्थेने ६० झाडे दिली. यात वड, कडूलिंब, पिंपळ, बेल, चिंच या झाडांचा समावेश आहे. ग्रामविकास मंडळाने झाडांसाठी ठिबकची व्यवस्था केली असून जगदंबा पतसंस्थेने झाडांसाठी खड्डे घेतले आहे.
जुन्नरचे सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांचे हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी उपसरपंच शुभांगी काळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, रवींद्र मुळे, विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक गायकवाड, माजी उपसरपंच शिवाजी खरमाळे, अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष रोहिदास गायकवाड, संचालक सर्जेराव कुचिक, प्रा. संतोष गायकवाड, संतोष पटाडे, सुरेश खरमाळे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र पोखरकर, जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष नंदकुमार काळे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुदाम गायकवाड, सदस्य संतोष मुळे, रोहिदास डोके, पंढरी थोरात, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन थोरात, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ तांबे, चंद्रकांत पोखरकर, निवृत्ती थोरात, पोलिस पाटील सुहास थोरात, शिवराम पोखरकर, शंकर शिंगोटे, रामदास पोखरकर, पंकज कुचिक, गोरक्ष डोके, अनिल डोके, सुशील गायकवाड, बाळू डोके, सुभाष थोरात, उत्तम डोके, शेखर कुचिक आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com