दावडी सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची हॅट्‍ट्रिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दावडी सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची हॅट्‍ट्रिक
दावडी सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची हॅट्‍ट्रिक

दावडी सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची हॅट्‍ट्रिक

sakal_logo
By

दावडी, ता. ३ : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या दावडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी विकास पॅनेलने बारा जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले. तर श्री महालक्ष्मी शेतकरी पॅनेलला एकही जागा जिंकता न आल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. यामध्ये १३ जागांपैकी जीवन किसन शिंदे यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - साहेबराव दुंडे, रामदास बोत्रे, गणेश गव्हाणे, संतोष गावडे, प्रकाश शिंदे, संपत लोणकर, संदीप गाडगे, बाळासाहेब वाघिरे, सुनीता मांजरे, विमल होरे, मल्हारी तरटे आणि भगवान ओव्हाळ.

भैरवनाथ पॅनेलने सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत कपबशी चिन्ह घेऊन सोसायटीवर वर्चस्व राखले असून, पॅनेलप्रमुख साहेबराव दुंडे यांनी तीनही निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवली आहेत. पॅनेल विजयी होण्यासाठी तुकाराम गाडगे, संतोष गव्हाणे, भाऊसाहेब होरे, सचिन नवले, संभाजी घारे, सोमा शिंदे, पांडुरंग दुंडे, दत्तात्रेय मांजरे, संभाजी डुंबरे, राहुल कदम, बाबाजी गाडगे व बाळासाहेब दुंडे यांनी प्रयत्न केले. सहायक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे, जे. बी. मुलाणी, संपतराव मलघे व रमेश पाचारणे यांनी निवडणूक कामकाज पाहिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Daw22b00816 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top