रेटवडी परिसरात बिबट्यांची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेटवडी परिसरात बिबट्यांची दहशत
रेटवडी परिसरात बिबट्यांची दहशत

रेटवडी परिसरात बिबट्यांची दहशत

sakal_logo
By

दावडी, ता. ११ : रेटवडी (ता. खेड) येथील पठाणवस्ती व सतारकावस्ती येथे मंगळवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा व आठ वाजता या दीड तासांच्या फरकाने दोन महिलांवर दोन बिबट्यांनी हल्ले केले. या परिसरात आतापर्यंत बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असून, बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रेटवडीच्या पठाणवस्ती येथे रिजवणा अब्दुल पठाण या महिलेवर रस्त्याने एकट्या जात असताना बिबट्याने मंगळवारी साडेसहाच्या दरम्यान हल्ला केला. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागास कळवले. त्यानंतर राजगुरुनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौंधळ, वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रेय फापाळे, वनरक्षक शिवाजी राठोड संदीप अरुण व ढोले असे पथक पोहोचले. त्याठिकाणी पाहणी केली असता बिबट्या झुडपात असल्याचे दिसून आले. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्याने आरडाओरडा करून हुसकावण्याचा प्रयत्न केला तरीही बिबट्या जागेवरच उभा होता. रिजवणा या किरकोळ जखमी असल्याने त्यांना राजगुरुनगर येथील खासगी रूग्णालयात उपचार करून घरी सोडले.
दरम्यान, सतारकावस्ती येथे रात्री आठ वाजता दुसऱ्या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याचे समजले. त्यात अरुणा संजय भालेकर ही महिला गंभीर जखमी झाली. बिबट्याने तोंडावर व डोक्याला पंजाने मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. भालेकर यांना ग्रामस्थांनी तातडीने चांडोली येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, डोक्याला झालेल्या जखमा खोल असून, जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे ससून रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी घडलेल्या घटना ताज्या असतानाच बिबट्याने बुधवारी (ता. ११) सकाळी सहाच्या सुमारास वाबळदरा येथे कांताराम रेटवडे या शेतकऱ्याचे कुत्रे खाल्ले.

वनविभागाच्या वतीने वाबळदरा येथे पिंजरा लावण्यात आला आहे. रेटवडी वन परिसरात बिबट्या तरस यांसारखे वन्य प्राणी आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगणे जरुरी आहे. रात्रीचे वेळी एकटे फिरू नये. एकटे असल्यावर मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावीत व वनविभाग वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे पालन करावे
- दत्तात्रेय फापाळे, वन परिमंडळ अधिकारी

Web Title: Todays Latest District Marathi News Daw22b00823 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top