जऊळके-रेटवडी येथील बिबट्या अखेर जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जऊळके-रेटवडी येथील
बिबट्या अखेर जेरबंद
जऊळके-रेटवडी येथील बिबट्या अखेर जेरबंद

जऊळके-रेटवडी येथील बिबट्या अखेर जेरबंद

sakal_logo
By

दावडी, ता. १३ : जऊळके खुर्द व रेटवडी (ता. खेड) या लगतच्या गावात मागील चार दिवसांपासून दोन महिलांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या पकडण्यास वनविभागाला यश आले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रेटवडी व जवळके खुर्द या लगतच्या गावात मागील चार दिवसांत बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या होत्या. यातील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच, एक कुत्रा व मेंढीचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. राजगुरुनगर वनविभाग व जुन्नर वनविभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. तसेच, दोन दिवस ड्रोनद्वारे शोध घेण्यात आला. ड्रोनमध्ये बिबट्या जऊळके परिसरातच आढळून आला होता. शुक्रवारी (ता. १३) रात्री आठच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. रेटवडी व जऊळके येथे महिलांना गंभीर जखमा करणारा बिबट्या हाच असल्याचे समजते. जेरबंद झालेल्या बिबट्याचे वय अंदाजे पाच वर्षे असून, त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठवले.

Web Title: Todays Latest District Marathi News Daw22b00825 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top