दावडी सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव दुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दावडी सोसायटीच्या 
अध्यक्षपदी साहेबराव दुंडे
दावडी सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव दुंडे

दावडी सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव दुंडे

sakal_logo
By

दावडी, ता. १५ ः दावडी (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव कोंडिबा दुंडे यांची तर उपाध्यक्षपदी जीवन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजगुरुनगर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दावडी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी साहेबराव दुंडे व उपाध्यक्षपदासाठी जीवन शिंदे यांचेच अर्ज आल्याने साहेबराव दुंडे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी जीवन शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे व संदेश गावडे यांनी जाहीर केले.
यावेळी सदस्य रामदास बोत्रे, गणेश गव्हाणे, संतोष गावडे, प्रकाश शिंदे, संपत लोणकर, संदीप गाडगे, बाळासाहेब वाघिरे, सुनीता मांजरे, विमल होरे, मल्हारी तरटे, भगवान ओव्हाळ तसेच वैशाली गव्हाणे, मयूर मोहिते, संतोष गव्हाणे, वंदना सातपुते, भाऊसाहेब होरे, संभाजी घारे, सचिन नवले, दत्तात्रेय मांजरे, पांडुरंग दुंडे, लक्ष्मण दिघे, राजाराम शिंदे, शंकरराव होरे, राहुल कदम, दत्तात्रेय कदम, बाजीराव बोत्रे, बाबाजी गाडगे, बाळासाहेब दुंडे, संतोष मांजरे, संभाजी दगडे व अनिल काळे उपस्थित होते. निवडीनंतर समर्थक व ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Daw22b00826 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top