दौंड पोलिस ठाण्यातील महिला पोलिसास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड पोलिस ठाण्यातील 
महिला पोलिसास मारहाण
दौंड पोलिस ठाण्यातील महिला पोलिसास मारहाण

दौंड पोलिस ठाण्यातील महिला पोलिसास मारहाण

sakal_logo
By

दौंड, ता. २८ : दौंड पोलिस ठाण्यात वाद घालणाऱ्या सासू व सुनेला शांत करण्यास गेलेल्या महिला पोलिस नाईक यांना सासूने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा व दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक कक्षाला लागून असलेल्या ठाणे अंमलदार कक्षात बुधवारी (ता. २७) दुपारी हा प्रकार घडला. सुरेखा बळिराम तायडे (वय ४३, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, बंगला साइड, दौंड) व त्यांची सून नयन गिरीश तायडे (वय २८, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) या दोघी ठाणे अंमलदार कक्षात आपसांत जोरात वाद घालत होत्या. दोघींचा गोंधळ वाढल्याने ठाणे अंमलदार यांनी पोलिस नाईक उषा हनुमंत अनारसे यांना दोघींचे भांडण सोडविण्यास सांगितले. उषा अनारसे या त्यांना समजावून सांगत असताना सुरेखा तायडे या महिलेने त्यांच्या अंगावर धावून जात गळ्यास बोचकरले. त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता सुरेखा तायडे हिने त्यांच्या तोंडात दोन चापटी मारत धक्काबुक्की केली. या प्रकरणी उषा अनारसे यांच्या फिर्यादीनुसार सुरेखा तायडे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01625 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top