दौंडला मनसेच्या शहराध्यक्षाचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडला मनसेच्या शहराध्यक्षाचा राजीनामा
दौंडला मनसेच्या शहराध्यक्षाचा राजीनामा

दौंडला मनसेच्या शहराध्यक्षाचा राजीनामा

sakal_logo
By

दौंड, ता. ३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानांवर नाराजी व्यक्त करीत येथील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांच्याकडे जमीर सिकंदर सय्यद यांनी सोमवारी (ता. २) राजीनामा सादर केला. राज ठाकरे यांची भोंग्यांसंबंधीची भूमिका चुकीची असल्याचे सांगत जे पूर्वीपासून चालू आहे ते चालू राहिले पाहिजे. त्याचबरोबर १ मे रोजी औरंगाबाद येथे ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दुखाविणारे आहे. समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे सय्यद यांनी सांगितले.

अ‍ॅड. पाटसकर यांना या बाबत विचारले असता त्यांनी सदर राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. सामाजिक बहिष्काराच्या भीतीने हे राजीनामे दिले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सोळा वर्षांपासून पक्षात
सलग १६ वर्षे मनसेमध्ये सक्रिय असलेल्या सय्यद यांनी मनसे वाहतूक सेनेचे दौंड शहराध्यक्षपद आणि मनसे एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मागील ३ वर्षांपासून ते शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे बंधू दहा वर्षे दौंड नगरपालिकेचे माजी सदस्य आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01628 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top