राष्ट्र विकासाकरिता दौंड येथे प्रार्थना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्र विकासाकरिता 
दौंड येथे प्रार्थना
राष्ट्र विकासाकरिता दौंड येथे प्रार्थना

राष्ट्र विकासाकरिता दौंड येथे प्रार्थना

sakal_logo
By

दौंड, ता. ३ : दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त राष्ट्र विकासाकरिता सामुहिक प्रार्थना करण्यात आली.
आज (ता. ३) सकाळी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत अबालवृद्ध मोठया संख्येने उपस्थित होते. सामूहिक नमाज पठणानंतर मौलाना मोहमद शमशाद कादरी यांनी धर्मसंदेश देण्यासह राष्ट्राच्या समृद्धी, सुरक्षा आणि सुयशाकरिता विशेष सामूहिक प्रार्थना केली. नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी दफनभूमीत जाऊन आप्त व स्वजनांच्या थडग्यांवर फुले वाहण्यात आली.
परस्परांना आलिंगन देत ‘ईद - मुबारक’ म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, पोलिस उप अधीक्षक राहुल धस, निरीक्षक विनोद घुगे, आदी या वेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बंदोबस्त आणि बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. दौंड व परिसरातील मुस्लिम बांधवांनी आप्तस्वकीय, मित्रमंडळी व हितचिंतकांना शिरखुर्मा व सुक्या मेव्याचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले होते. त्याशिवाय विविध संघटनांच्या वतीने ईदनिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01629 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top