दौंडमध्ये गहू ३१०० रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये गहू ३१०० रुपये क्विंटल
दौंडमध्ये गहू ३१०० रुपये क्विंटल

दौंडमध्ये गहू ३१०० रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. ४ : दौंड तालुक्यातील गव्हाची आवक वाढली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची १२०८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान १९५० रुपये; तर कमाल ३१०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची ११८८ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १९०० व कमाल २९०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत आहे. भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर असून, बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात लिंबाच्या अवघ्या ०२१ डागांची आवक झाली असून, त्यास प्रतिडाग किमान २००० रुपये, तर कमाल ३५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. केडगाव येथे कांद्याची ५७२५ क्विंटल आवक झाली असून, प्रतवारीनुसार किमान ३५० रुपये; तर कमाल १२०० प्रतिक्विंटल, असा असा बाजारभाव मिळाला. फ्लॅावरची ५०० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल ३०० रुपये , कोथिंबिरीस शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ७०० आणि मेथीस शेकडा किमान ५०० व कमाल १००० रुपये, असा बाजारभाव मिळाला.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो- ३००, वांगी- २००, दोडका- २५०, भेंडी- १५०, कारली- ४००, हिरवी मिरची- ५६०, गवार- ४००, भोपळा- ०५०, काकडी- १००, शिमला मिरची- ३७०, कोबी- ७५.

शेतमालाची आवक (क्विंटल) व बाजारभाव (रुपयांत)
शेतमाल आवक किमान कमाल
ज्वारी ३१७ १९५० ३६५१
बाजरी २२७ १८०० २८००
तूर ०२१ ४००० ४५००
हरभरा १५५ ३८५१ ४५००
मका ००७ १९०० २२५०

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01630 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top