
दौंड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. जाधव
दौंड, ता. ७ : दौंड तालुका अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. सुरेश काशिनाथ जाधव हे ७७ मतांच्या फरकाने विजयी झाले. उपाध्यक्षपदी अॅड. सपना राकेश अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अॅड. सुरेश जाधव व अॅड. राजेंद्र भिसे यांच्यात लढत झाली. वैध १३३ मतांपैकी अॅड. सुरेश जाधव यांना १०५ तर अॅड. राजेंद्र भिसे यांना २८ मते पडली. जाधव हे २८ वर्षांपासून वकिली करीत असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड शहर सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. उपाध्यक्षा सपना अग्रवाल या वकील संघटनेच्या माजी खजिनदार असून पर्यावरण संवर्धन क्षेत्रात त्या सक्रिय आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उदय फडतरे व विष्णुपंत माने यांनी काम पाहिले तर माधव आवचर, उमा कुलंगे, प्रीती बलदोटा यांनी निवडणूक प्रक्रियेत साहाय्य केले.
बार असोसिएशनची कार्यकारिणी
सचिव - महेंद्र आव्हाळे, उपसचिव - अजित दोरगे, खजिनदार - विजय काकडे, ग्रंथपाल - सौम्या जेम्स, हिशोब तपासणीस - ऋषीकेश काकडे.
Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01631 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..