दौंड तालुक्यात बाजरी २९०० रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात बाजरी २९०० रुपये क्विंटल
दौंड तालुक्यात बाजरी २९०० रुपये क्विंटल

दौंड तालुक्यात बाजरी २९०० रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. ११ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक घटली असून बाजारभावात वाढ झाली आहे. बाजरीची २१० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान १९५१ रुपये; तर कमाल २९०० बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात बाजरीची २२७ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १८०० व कमाल २८०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कडून भुसार माल व भाजीपाल्याची आवक आणि बाजारभावाची माहिती देण्यात आली. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव तेजीत आहे. भुसार मालाची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची बाजारभावात वाढ झाली आहे.

केडगाव उपबाजारात लिंबाच्या अवघ्या ३० डागांची आवक झाली असून प्रतिडाग किमान ११०० तर कमाल ४०५१ असा बाजारभाव मिळाला. केडगाव येथे कांद्याची ९१५१ क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ३५० रुपये; तर कमाल १२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रुपये) कमाल (रुपये)
गहू ९८९ १९५० २८०१
ज्वारी ३३२ १७०० ३१०१
तूर ०१० ५००० ५५००
हरभरा १७४ ४००० ४३००
मका ०४७ २००० २२५०


भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर)
टोमॅटो - ३५०, वांगी - २५०, दोडका - २५०, भेंडी - २५०, कारली - ४००, हिरवी मिरची - ५६०, गवार - ४००, भोपळा - ०७५, काकडी - १००, शिमला मिरची - ४००, कोबी - १००, फ्लॉवरची ४५० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान १००; तर कमाल २५० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ९०० आणि मेथीस शेकडा किमान ५०० व कमाल १००० रुपये असा बाजारभाव मिळाला.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01637 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top