
गिरीममध्ये नऊ जणांवर गुन्हा दाखल
दौंड, ता. १७ : गिरीम (ता. दौंड) येथील वायरलेस फाटामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत दौंड पोलिसांनी इंदापूर, दौंड व बारामती तालुक्यातील एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख १३ हजार ९४० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
वायरलेस फाटा येथील साई पॅलेस हॅाटेलच्या शेजारील शेतात जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांनी याप्रकरणी काल (ता. १६) दीपक बाळू जाधव (वय २८, रा. वंजारवाडी, ता. बारामती), नारायण काशिनाथ जगताप (वय ४२, रा. सुपा, ता. बारामती), लाला बबन लोणकर (वय ४४, रा. केडगाव, ता. दौंड), प्रदीप खरचीलाल करचे (वय ३७, रा. भिगवण, ता इंदापूर), हरिश्चंद्र देवचंद भोंडवे (वय ४३, रा. खंडू खैरेवाडी, ता. बारामती), योगेश यशवंत खरात (वय ३४, रा. पणदरे, ता. बारामती), अजय दादू सकट (वय २९, रा. सुपा, ता. बारामती), दिगंबर वाघमोडे व मुत्रा आसिफ शेख (रा. शालीमार चौक, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान दिगंबर वाघमोडे व मुन्ना शेख पळून गेले.
Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01644 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..