सोनवडीतील लूटमारप्रकरणी चार जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनवडीतील लूटमारप्रकरणी चार जणांना अटक
सोनवडीतील लूटमारप्रकरणी चार जणांना अटक

सोनवडीतील लूटमारप्रकरणी चार जणांना अटक

sakal_logo
By

दौंड, ता. २६ : दौंड - नगर रस्त्यावर झालेल्या लुटमारीत दुकान व्यवस्थापकाकडील दोन लाख तीस हजारांची रोकड चोरणाऱ्या टोळीतील चार तरुणांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे.
दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील पटेल एजन्सी या बांधकाम साहित्याच्या दुकानाचे व्यवस्थापक कांतिलाल घनजी पारसिया (वय ४६ , रा. दौंड) हे २९ एप्रिल रोजी काष्टी येथील दुकान बंद करून सायंकाळी दुचाकीवरून मुलगा दीप याच्यासह दौंडकडे दुचाकीवर निघाले होते. सोनवडी (ता. दौंड) येथील भीमा नदी पुलाच्या पुढे त्यांना दुचाकीवरील चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील २ लाख ३० हजार रुपयांची रोकड व एक मोबाईल संच चोरला होता. दौंड पोलिसांनी या प्रकरणी तपास करून ओमकार वाघमोरे (वय १९), सिद्धार्थ आकोटे (वय २१), सम्मद तांबोळी (वय २४) व सागर धेंडे (वय २३, चौघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांना अटक केली आहे.
संशयित चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या अन्य दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. दौंड न्यायालयात संशयित आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद घुगे, फौजदार शहाजी गोसावी, महेश आबनावे, हवालदार सुभाष राऊत, नाईक निखिल गवळी, आदेश राऊत, अमोल गवळी, कॅान्स्टेबल अमोल देवकाते, अभिजित गिरमे, रवी काळे, आदींनी या गुन्ह्याचा तपास केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01650 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top