दौंड तालुक्यात कांदा १६०० रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात कांदा १६०० रुपये क्विंटल
दौंड तालुक्यात कांदा १६०० रुपये क्विंटल

दौंड तालुक्यात कांदा १६०० रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. १ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून बाजारभावात मात्र ५५० रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची २८०० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०४०० रुपये; तर कमाल १६०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात कांद्याची ५,२५० क्विंटल आवक होऊन त्यास किमान ०३०० रुपये; तर कमाल १०५० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भुसारमाल व भाजीपाल्याची आवक आणि बाजारभावाची माहिती देण्यात आली. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभावात तेजीत आहे. भुसारमालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ आहे. केडगाव उपबाजारात लिंबाच्या अवघ्या ३० डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान ७८१ तर कमाल १६०१ असा बाजारभाव मिळाला.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर ) : टोमॅटो - ५०० , वांगी - ३०० , दोडका - ४०० , भेंडी - २५० , कारली - ४००, हिरवी मिरची - ५००, गवार - ५५०, भोपळा - ०७५, काकडी - २००, शिमला मिरची - ५०० , कोबी - १२५. फ्लॉवरची ४१० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान १५० ; तर कमाल ३८० रुपये , कोथिंबिरीस शेकडा किमान १००० रुपये , तर कमाल २३०० आणि मेथीस शेकडा किमान १००० व कमाल २००० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू.) कमाल (रू)
गहू ५९५ १९०० २७५१
ज्वारी २३७ १६२५ ३०००
बाजरी १९६ १७५१ २८००
तूर ००४ ५००० ५५००
हरभरा १३४ ३९०० ४२००
मका ०३१ १५०० २२००
चवळी ०२६ ६५०० ७२००
मूग ०५५ ६००० ६५००

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01656 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top