दौंडमधील तेरा जागा महिलांसाठी राखीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील तेरा जागा
महिलांसाठी राखीव
दौंडमधील तेरा जागा महिलांसाठी राखीव

दौंडमधील तेरा जागा महिलांसाठी राखीव

sakal_logo
By

दौंड, ता. १३ : दौंड नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. एकूण सव्वीस जागांपैकी अनुसूचित जातीसाठी सहा व अनुसूचित जमाती करिता एक जागा आरक्षित केली आहे. तर, तेरा जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत.
नगरपालिका कार्यालयात सोमवारी (ता. १३) प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्या उपस्थितीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत प्रभाग संख्या १२ होती व यंदा त्यामध्ये एकाने वाढ झाल्याने प्रभागांची संख्या १३ झाली आहे. या १३ प्रभागांमधून २६ सदस्य निवडून येणार आहेत.

जातीनिहाय आरक्षित प्रभाग
अनुसूचित जाती- १ अ, ६ अ, ९ अ.
अनुसूचित जाती महिला- २ अ, ७ अ, ८ अ.
सर्वसाधरण- २ ब, ३ ब, ४ ब, ५ ब, ७ ब, ८ ब, १० ब, ११ ब, १३ ब.
सर्वसाधरण महिला- १ ब, ३ अ, ४ अ, ५ अ, ६ ब, ९ब , १० अ, ११ अ, १२ ब, १३ अ.
अनुसूचित जमाती- १२ अ.

ओबीसी उमेदवारांचे नुकसान
दौंड नगरपालिकेच्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत २४ जागांपैकी ६ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारांसाठी राखीव होत्या. यावेळी ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत निघाली. त्यामुळे ओबीसी उमेदवारांचे नुकसान झाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01666 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top